उस्मानाबाद :- समाजात वैरत्व, दुजाभाव, संशय आदि कारणामुळे भांडण-तंटे उत्पन्न होतात. शिवाय शुल्लक कारणानेही तंटे निर्माण होतात. शक्यतो प्रत्येकाने सामंजस्याची भुमिका ठेवल्यास वादच निर्माण होणार नाहीत, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. ए. कुलकर्णी यांनी केले.
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित महा-लोकअदालतीचे उदघाटन न्या. देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा न्यायाधिश बी. एस. महाजन, जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. आर. पाटील,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश पी.बी. मोरे आदि उपस्थित होते.
न्या. कुलकर्णी पुढे म्हणाले की, कोर्टात प्रकरणे अनेक वर्ष चालू राहिल्याने सामाजिक, आर्थिक , कौटुंबिक, शैक्षणिक समस्यांना अनेक कुटुंबाना सामोरे जावे लागते. कोर्टात प्रकरणे अनेक वर्ष चालल्याने वेळ व पैसा वाया जातो. वारंवार कोर्टात येण्याने मानसिक ताण-तणाव वाढतो. हे टाळण्यासाठी संबंधित पक्षकारांनी सामोपचाराचा मार्ग स्वीकारुन आपसातील प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यातच सामाजाचे हित आहे. आपसात मतभेद, वाद मिटल्याने दोघांच्याही मनात कटुता राहत नाही व वैरत्वही राहत नाही. असेही न्या. देशपांडे यांनी नमूद केले.
उदघाटनपर भाषणात जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, दोघांचे पटत नसल्याने वाद निर्माण होतात. त्यातून कोर्ट कचेरी व वकीलाकडे न्याय मागण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. वर्षानुवर्षे वाद राहिल्याने वादी-प्रतिवादींना सामाजिक, कौटुंबिक,मानसिक त्रास सहन करावा लागतो. प्रत्येकाला वाटते की, कोर्टात गेल्याबरोबर न्याय लवकर मिळाला पाहिजे. ते महालोकअदालतीच्या माधयमातून शक्य आहे.
आपल्या प्रास्ताविकात न्या. महाजन म्हणाले की, या अदालतीनेमध्ये 763 दिवाणी, 328 फौजदारी, चेक न वटण्याचे 503, मोटार अपघात व कामगार नुकसान भरपाई, भूसंपादन आदिंची 1 हजार 837 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली असून ही प्रकरणे सात पॅनलवर तडजोडीने मिटविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश, विधिज्ञ, पक्षकार, विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी मोठया संख्येने हजर होते.