उस्मानाबाद :- उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्त्यांचा क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हयातून गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू ( 1 महिला, 1 पुरुष) हे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी दि. 1 जुलै ते 30 जुन या कालावधीसाठी मागील तीन वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी कळविले आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे त्या जिल्हयात किमान 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, क्रीडा कार्यकर्त्यांनी सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे. क्रीडा कार्यकर्त्यांनी सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले पाहिजे. खेळाडूने दोन वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले पाहिजे.
क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील. नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहीत नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या मुदतीत सादर करावे.
गुणवंत क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा कार्यकर्ते, संघटक यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन तीन प्रकारे करण्यात येणार आहे. विकासात्मक कार्य, संघटनात्मक कार्य व क्रीडा प्रचार व प्रसार सदरील सर्व कामाबाबत संबंधित जिल्हा व राज्य संघटनेची प्रमाणपत्रे जोडावीत. क्रीडा कार्याचा किमान दहा वर्षाचा अनुभव व त्याचे वय किमान 30 वर्षे पूर्ण केलेले असावे. पुरक अंग म्हणून स्पर्धामधील कामगिरीसुध्दा विचारात घेतली जाईल.
तरी संबंधितानी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहीत नमुन्यात अर्ज दि. 20 मार्चपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.