तुळजापूर -: दोन घरावर शसस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील महिला व पुरुषांना बेदम मारहाण करुन महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असे मिळून सुमारे सव्वा तीन लाख रूपयाचा ऐवज घेऊन पलायन केले. ही घटना मंगळवार दि. २६ मार्च रोजी पहाटेपूर्वी तुळजापूर ते आपसिंगा जाणा-या रस्त्यावरील दिपज्योतीगर येथे घडल्याने शहर व परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत पांडुरंग माने, अजित माने हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीसांनी सांगितले की, शहरातील आपसिंगा रस्त्यावर दिपज्योती नगर आहे. येथील येथील पांडूरंग माने यांच्या घरावर २० ते ३० वयोगटातील दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी सर्वप्रथम आजूबाजूच्या घरांना बाहेरून कुलूप लावले. पांडूरंग माने यांच्या घराचा दरवाजा पहारीने तोडून घरात प्रवेश केला. पांडूरंग माने यांचा मुलगा अजित माने याला तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सुनबाई अश्विनी माने यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने, मंगळसुत्र, कर्णफुले, अंगठी, बोरमाळ, करंडे, पंचपाळ, रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा १ लाख ६० हजार १०० रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर मारूती गोरे यांच्या घरात दाब टाकून प्रवेश केला. तेथेही मारूती गोरेंना व त्यांच्या पत्नींना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोने-चांदीचे दाग-दागीने, तीन मोबाईल, कपाटातील रोख रक्कम असा १ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी माने यांच्या घरातील फ्रिजमध्ये ठेवलेला फळाचा ज्युस पिऊन पाणी घेतले. नंतर तंबाखू खाऊन निवांतपणे दरोडेखोर पसार झाले. या घटनेमुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर हे करीत आहेत.