उस्मानाबाद :- दुष्काळी परिस्थतीत फळबाग व भाजीपाला पिकांचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हयामध्ये जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा एक भाग म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ मौजे कुमाळवाडी येथे करण्यात आला. तेथील शेतकरी इन्नुस बाबासाहेब शेख यांच्या शेतात हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक व्ही .डी. लोखंडे तर अध्यक्षस्थानी कुमाळवाडीचे उपसरपंच दीपक रणखांब उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी एस. पी.जाधव, येडशीचे मंडळ कृषि अधिकारी अे. पी. चिक्षे, कृषि पर्यवेक्षक श्री. पाटील, कृषि सहायक व्ही.एस. सुर्यवंशी, वाय. एन. इंगळे, अनिल घोगरे व के.ए. मगर आणि भाजीपाला व फळबाग उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
लोखंडे यांनी हा सप्ताह आयोजित करण्याबाबतचे महत्व विशद करुन शेतक-यांनी पाणी बचतीसाठी सेंद्रीय आच्छादन करुन पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी माहिती दिली. कार्यकमाचे प्रास्ताविक श्री. चिक्षे यांनी करुन कुमळवाडी येथे 27 शेतक-यांनी 10.40 हेक्टर क्षेत्रावर प्लॅस्टीक आच्छादनामध्ये लागवड केल्याची माहिती दिली. या प्रसंगी श्री. एस.पी.जाधव यांनी यापुढे उस, फळबाग भाजीपाला व पिके ठिबक व तुषार सिंचन शिवाय घेऊ नयेत असे अवाहन केले. ठिबक सिंचानामुळे 60 ते 70 टक्के पाण्याची बचत होऊन उत्पादन 10-15 टक्के वाढ मिळणे हे प्रयोगांती सिध्द झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी फळबाग व भाजीपाला उत्पादन शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.