उस्मानाबाद -: झी 24 तास चे उस्‍मानाबाद जिल्‍हा प्रतिनिधी महेश पोतदार यांना असोसिएशन इलेक्‍ट्रॉनिक मिडीच्‍यावतीने दिला जाणारा सवोत्‍कृष्‍ट ग्रामीण पत्रकार पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला आहे. द हिंदू चे संपादक सिध्‍दार्थ वरदानजन यांच्‍या हस्‍ते पुणे येथे हा पुरस्‍कार महेश पोतदार यांना प्रदान करण्‍यात आला.
    ग्रामीण भागात राहून उत्‍कृष्‍ट काम करणा-या पत्रकारासाठी कै. चपळगावकर यांच्‍या नावाने देण्‍यात येणा-या पहिल्‍याच पुरस्‍काराचे झी 24 तास चे जिल्‍हा प्रतिनिधी महेश पोतदार हे मानकरी ठरले आहेत. दि. 16 मार्च मार्च रोजी द हिंदू चे इंग्रजी वृत्‍तपत्राचे संपादक सिध्‍दार्थ वरदराजन यांच्‍या हस्‍ते पुणे येथील केसरीवाडा येथे सवोत्‍कृष्‍ट ग्रामीण पत्रकार पुरस्‍काराने महेश पोतदार यांना गौरविण्‍यात येतो. या पुरस्‍कार वितरण समारंभास विविध वृत्‍तपत्रांचे संपादक, पत्रकार, वृत्‍तवाहिन्‍यांचे पत्रकार, राजकीय व सामाजिक मान्‍यवर मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top