बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वाढत्या स्पर्धेत विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून बातम्या देतांना घाई गडबड केली जाते. आपण दिलेल्या बातमीबाबत शहानिशा न करता अथवा त्याबाबत आवश्यक असलेल्या पुराव्यांची जुळवाजुळवी न करता बातमी छापली जाते. सदरच्या घटने विरुध्द कायदेशीर लढाई सुरु झाल्यावर मात्र आपल्याला त्याच्या पुराव्याची शोधाशोध करावी लागते व त्यावेळी आपल्या हातात काहीच नसते. त्यासाठी पत्रकारांनी बातमी देण्याअगोदर पुरावे गोळा करावे, असे मत सोलापूर येथील विधीज्ञ राज पाटील यांनी व्यक्त केले.
बार्शी प्रेसच्या वतीने आयोजित वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेत ते बोलत होते. रविवारी सायंकाळी चार वाजता सावळे सभागृह येथे हे मार्गदर्शन शिबीर पार पडले. या कार्यशाळेत सोलापूर येथील विधीज्ञ राज पाटील तसेच बार्शी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आमोद भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एन.आर.कुलकर्णी होते.
यावेळी व्यासपीठावर महिला पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, शोभा पडवळ, शेती मित्र मासिकाचे संपादक प्रमोद पाटील, अँड. विकास जाधव, अँड. राजश्री डमरे, नगरसेविका रिझवाना शेख आदिजण उपस्थित होते.
पुढे बोलतांना पाटील म्हणाले, एखादी घटना घडल्यावर त्या घटनेच्या बाबत वार्तांकन करतांना आपण घटनेच्या तपशीलाला मर्यादित स्वरुपात प्रसिध्द न करता त्याच्या घटना न घडलेल्या व नसलेल्या मागोव्याचे वृत्त देऊन बातमी रंजक करुन आरोपीला मोठा गुन्हेगार असल्याची प्रतिमा निर्माण करुन त्याची मोठ्या प्रमाणात बदनामी करतो. पिडीत स्त्रियांच्या अथवा मुलींच्या संदर्भात आपण त्याच्या घटनेत नेमका कोणाबाबत झाल्या हे अप्रत्यक्षरीत्या उघड करुन पिडीत महिहलेला चव्हाट्यावर आणतो व त्या स्त्रीचे जीवन संपवतो. सदरच्या घटनांबाबत आपण जागरुकपणे काम करणे गरजेचे असून या सारखे वृत्त देतांना आपण काळजी घेणे गरजेचे आहे. न्यायालयीन खटल्यातील बातम्यांच्या वेळी अनेक वेळा आपण दिलेल्या बातम्यांमुळे एखाद्या साक्षीदाराचे मनोधैर्य खचण्याची शक्यता असते. सदरच्या घटनेमुळे मुख्य आरोपीला शिक्षा होत नाही व अन्याय झालेल्या पिडीतास न्याय मिळत नाही याचीही आपण खबरदारी घेणे आवश्यक असते. अनेक वेळा ज्यांच्यावर अन्याय झाला ती व्यक्ती त्याबाबतचे पुरावे गोळा करुन बातमीदारास देते. यात व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ रेकॉर्डिंग इत्यादी देण्यात येते. परंतु त्यावेळी त्या व्यक्तीकडून सदरची रेकॉर्डींग ही मी स्वत: केली असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र घेणे आवश्यक असते. प्रेसनोट घेतांना त्यातील आशय बदलून चालनार नाही. त्याचा सारांश येणे गरजेचे आहे. सदरच्या प्रेसनोटवर संबंधीतांच्या स्वाक्षर्या असाव्या.
सहाय्यक पोलिस निरीक्षक आमोद भुजबळ बोलतांना म्हणाले, अनेक वेळा पोलिस ठाण्यातील माहिती अथवा एखाद्या घटनेच्या माहितीमध्ये संबंधीत अधिकार्यांची पदनामे चुकीची छापली जातात. अनेक वेळा घाईगडबड करुन बातम्या छापून गुन्हेगारांस पळून जाण्यास सावध केले जाते. बातमी छापतांना त्याचे बारकावे समजावून घेणे गरजेचे आहे. अति उत्साही पणामुळे एखाद्याला नैराश्य येता कामा नये, आपण चांगल्या उद्देशाने बातम्या देता परंतु त्याचा परिणाम हा समाजावर घडू शकतो. सध्या जगाबरोबर स्पर्धा करताना पोलिस यंत्रणा ही सुसज्ज होत आहे. सी.सी.टी.व्ही कॅमेरा, इंटरनेट इत्यादी सुविधा आल्या असून संपूर्ण जगाशी जोडले जात आहेत. दिल्लीतील गँगरेपच्या बाबत बोलायचे झाले तर त्या घटनेचे ठिकाण व वेळ याचे अवलोकन करावे रात्री 11 वाजता सदरची मुलगी ही एकटी घराबाहेर होती व त्यावेळचे नैसिर्गक वातावरण इत्यादी अनेक घटनांच्या पार्श्व भूमीचा विचार करायला हवा. मुलींनीही आपण केंव्हा व कोठे काय करतो याचा विचार करयला हवा.
प्रारंभी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सचिन वायकुळे यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत घोडके यांनी केले. तर आभार सुदर्शन हांडे यांनी मानले.