उमरगा -: सुपतगाव (ता. उमरगा) येथे मंगळवार दि. 19 मार्च रोजी अचानक लाग लागून आठ घरे व नऊ जनावरांच्‍या गौठ्यासह संसोरापयोगी साहित्‍य व शेतीची अवजारे शेतीची अवजारे जळून खाक झाली होती. गुरुवार दि. 21 मार्च रोजी उस्‍मानाबाद जिल्‍हा बँकचे अध्‍यक्ष बापूराव यांनी लोखंडे कुटुंबियाचे सांत्‍वन करुन दहा हजार रूपयांची आर्थिक मदत केली. त्‍याचबरोबर भीमराव लामजणे प्रशालेकडून 2 हजार 100 रूपये, जिल्‍हा परिषद शाळेकडून 1 हजार 400 रूपयाची मदत जळीतग्रस्‍तांना मिळाली आहे. या कार्यात सरपंच दादासाहेब घोडके, मदन पाटील, दिलीप भालेराव यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी पुढाकार घेतला.
 
Top