उस्मानाबाद -: आपसिंगा (ता. तुळजापूर) येथील एका शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळुन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सहा सावकाराविरुध्द तुळजापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर नामदेव तोडकरी, श्रीहरी सरडे, साहेबराव अर्जुन सरडे, जयद्रथ सरडे (सर्व रा. अपसिंगा), युवराज तावसकर (रा. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकारांचे नाव आहे. तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील शेतकरी यांनी वरील सावकरांकडून शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या पैशासाठी व त्याच्यावरील व्याजासाठी या लोकांनी अनदाने यांना नेहमीच जाच करुन धमकी देत असल्याने या सावकरांकडुन होणा-या जाचाला कंटाळुन अन्नदाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयत परमेश्वर अनदाने यांच्या पत्नीने तुळजापूर पोलीसात फिर्यादी दिल्यावरुन वरील सहा सावकारांविरूद्ध तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीखक साबळे हे करीत आहेत.