उस्मानाबाद :- राज्याचे पशुसवंर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील नांदुरी,काळेगाव, दिंडेगाव व टेलरनगर  या गावाना  पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळनिवारणार्थ दिनांक 9 मार्च रोजी भेटी देवून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.
      या  प्रसंगी त्याच्या समवेत माजी आमदार नरेद्र बोरगावकर जि.प.सदस्य बंडगर जि.प.सभापती पंडीत जोकार तुळजापूर प.स.उपसभापती प्रकाश चव्हाण गट विकास अधिकारी तृप्ती ढेरे तहसीलदार व्यंकटराव कोळी बांधकाम विभगाचे उपअभियंता किरकसे तालुका कृषि अधिकारी जाधव   पाणी पुरवठा उपअभियंता दशरथ देवकर यांच्या सह पदाधिकारी व संबंधित यंत्रणचे अधिकारी उपस्थित होते.
       नांदुरी येथील नागरिकांशी चर्चा करुन उपलब्ध असणारे पाणी कसे देता येईल या बाबत उपाययोजना करुन तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या येथील नवीन तलाठी कार्यालयाचे उदघाटन व दलित वस्ती येथील सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गरजू शेतकऱ्यांना जनावरांसाठी मोफत पशुखाद्या.वाटप करण्यात आले. या प्रसंगी सरपंच शंकर साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते. काळेगाव येथील तलावात घेण्यात आलेल्या विहरीमधून कसई व गावस पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ग्रामस्थांशी चर्चाकरुन उपलब्ध पाणी येथील जनतेला देणयाबाबत . तसेच बचाटे वसतीमध्ये नवीन बोर घेण्याबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश दिले.
      दलित वस्ती सुधारण्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिला असून यामधून सुविधा देण्याचे कामे सुरु आहेत. घरकुल योजनेमधून संबंधित लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. तसेच दिंडेगाव व टेलरनगर येथील जनतेच्या आडी अडचणी जाणून घेवून तात्काळ उपाययोजना करण्याबाबत व टेलरनगर येथील जुण्या आडामधील गाळकाडून पाणी पुरवठा करण्याबात सूचना दिल्या. या प्रसंगी मुखबधीर मुलाच्या मातेची करुन याचना ऐकून घेवून त्यांना सहकार्य करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्दश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. या प्रसंगी संबंधित गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी ग्रामस्थ पदाधिकारी संबंधित यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.                 
 
Top