बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विश्वेश्र्वर सहकारी बँक पुणेच्या निवडणूकीत सन 2013 ते 18 या पंचवार्षिक संचालक मंडळाची बिनविरोध िनवड करण्यात आली. बी.जी.शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे सदरची सभा संपन्न झाली. बँकेला बहुराज्यीय सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त झाल्या नंतरची ही पहिलीच निवडणूक होती.
निवड करण्यात आलेल्या 11 संचालकांमध्ये सुनिल रुकारी, अनिल गाडवे, बापूसाहेब धनकवडे, शरद हापसे, राजेंद्र मिरजे, अमोल मणियार, नंदकुमार होनराव, गोविंद कामठे, रामचंद्र जोतकर, सौ. कल्पना गंजीवाले, सौ. संजीविनी तोडकर यांचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना सुनिल रुकारी यांनी म्हटले सध्याच्या सहकारी क्षेत्रावरील लोकांचा विश्वास कमी होत असतांना बँकेच्या सर्वसभासदांनी विश्वेश्वर बँकेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखिवला आहे. संस्थेच्या हिताकरिता संचालकांनीही निवडणूकीचा खर्च टाळून संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडले. उवकरच वाशी-तुर्भे येथे नवीन शाखा सुरु होत आहे.
माजी संचालक शरद गंजीवाले यांनी नूतन संचालकांचे अभिनंदन केले. बार्शीतील नंदकुमार होनराव यांची निवड झाल्याने अनेक नामवंत व्यक्तींनी अभिनंदन केले.