सांगोला (राजेंद्र यादव) -: जगभरात सापाच्या अडीच हजाराहून अधिक जाती असून कोणताही साप दूध पीत नाही. यापैकी फक्त 63 सापाच्या जाती विषारी आहेत. जगातील सर्वात मोठा साप ऍनाकोंडा आहे, असे प्रतिपादन डॉ.विधीन कांबळे यांनी केले. 
           शुक्रवार दि. 22 मार्च रोजी सांगोला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी तर्फे आयोजीत सर्प-समज आ णिगैरसमज या विषयावर डॉ. कांबळे हे बोलत  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले होते. तर कार्यक्रमास संस्था सचिव म.सि.झिरपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. कांबळे यांनी सापाविषयीचे अनेक गैरसमज सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कृष्णा इंगोले यांनी डॉ.कांबळे यांच्या शोधनिबंधाचे कौतुक केले. प्रास्ताविक व आभार प्रबोधिनीचे प्रमुख डॉ.एस.एल.पाटील यांनी केले. यावेळी टॅली, डी.टी.पी. प्राप्त विद्यार्थ्यांना संस्थासचिव म.सि. झिरपे व प्राचार्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले. या शॉर्ट टर्म कोर्सचे संयोजक म्हणून डॉ.विधीन कांबळे यांनी केले. तर संगणक शिक्षण देण्याचे काम विभागाच्या प्रमुख वर्षा देशपांडे यांनी केले.
 
Top