
सोलापूर येथे होम मैदानावरती आयोजीत भव्य नोकर भरती अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करून गावागावात भित्तीपत्रके लावून प्रत्येक गावातील लोकांना अभियानाबद्दल माहिती सांगून लोकामध्ये जागृती करून, सुशिक्षित बेरोजगारांनी मोठ्या प्रमाणात भरती होण्याचे आवाहन केले आहे. यापुर्वीच्या नोकर भरतीमध्ये भरती झालेल्या युवकांच्या यशस्वतेनंतर लोकांच्यामध्ये एक विश्वासाची भावना निर्माण झाली असल्याचे सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती बेरोजगारीच्या वाढत्या समस्येने त्रस्त झालेल्या युवकांसाठी हा मेळावा म्हणजे एक सुवर्ण संधी मानली गेली आहे. कारण राज्य, देश, विदेश पातळीवरील ती नामांकीत कंपन्यामध्ये 5 वी पास ते पदवीधर, आय.टी.आय., डिप्लोमा, कॉम्प्युटर झालेल्या 4500 बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ उठवावा व जास्तीत जास्त युवकांनी भरती होण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे सांगोल्यातून 2 हजार युवक जातील, असे जगदीश बाबर यांनी सांगून त्यांना भरती होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.