दयानंद काळुंके
नळदुर्ग -: राष्ट्रसेवा दलाची 'आपलं घर' नळदुर्ग येथे नुकतीच बैठक संपन्‍न झाली. या बैठकीत राष्ट्रसेवा दलाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून  या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा संघटक म्‍हणून सामाजिक कार्यकर्ते दयानंद काळुंके यांची तर कार्याध्यक्षपदी प्रा. शरद गायकवाड यांची निवड करण्यात आली. सदस्य म्‍हणून भैरवनाथ कानडे, संतोष बुरंगे, विक्रांत संगशेट्टी, गजानन भोसले,  बबिता महानूर, जी. सी. नेरे, अंकुश जाधव यांची तर निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. किरण सगर, अँड. देवीदास वडगावकर, दिलीपराव गणेश, महानंदा चव्हाण यांची निवड करण्यात आली. राज्यमंडळ सदस्यपदी शाखा नायक प्रतिनिधी अजय धोतरकर, राज्य मंडळ सदस्य महिला प्रतिनिधी विजयाबाई बिवलकर तर मंडळ सदस्य म्हणून निजगुण स्वामी यांची निवड करण्यात आली. या बैठकीस अध्यक्ष अँड. देवीदास वडगावकर तर संघटनेचे निरीक्षक सदाशिव मगदूम, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, अँड. रेवण भोसले यांची उपस्थिती होती. जिल्‍हा संघटक म्‍हणून दयानंद काळुंके तर सदस्‍यपदी भैरवनाथ कानडे यांची निवड झाल्‍याबद्दल त्‍यांचे तुळजापूर लाईव्‍हचे संपादक शिवाजी नाईक यानी अभिनंदन केले.
 
Top