बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भगवंत इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉ़जी अभियांत्रीकी महाविद्यालयास 2013-14 या शैक्षिणक वर्षापासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून मेकॅनिकल इंजिनअरिंग (एम.ई) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 18 जागांची मान्यता तर डिप्लोमा इन सिव्हील इंजिनयरिंग या पदविका अभ्यासक्रमासाठी 60 जागांना मान्यता मिळाल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.
बार्शीत भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयाची सोय झाल्यामुळे तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न व गैरसोय दूर झाली आहे. या महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनयरिंग 120 जागा, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन 60 जागा, सिव्हील 60 जागा, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअर 60 जागांना अभ्यासक्रमाची व्यवस्था उपलब्ध आहे. 2012-13 पासून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर व इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरसाठी प्रत्येकी 60 जागांचा अभ्यासक्रम सुरु आहे.
बार्शीसारख्या ठिकाणी प्रशस्त इमारत, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, वर्कशॉप, ग्रंथालय, क्रीडांगण, विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, बसची सोय इत्यादी सोयी चांगल्या प्रकारे उपलब्ध केल्याने ए.आय.सी.टी.ई. ने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ङ्कान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी विद्यापिठात गुणवत्ता प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना 41,000 ते 50,000 पर्यंत रोख पारितोषिके देण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा तसेच विविध गुणदर्शन इत्यादींमध्ये चमकदार कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येत असून देशाला कुशल तंत्रज्ञ मिळवून देतांना सुजान नागरिक देखिल मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. उच्चशिक्षण घेण्यास पात्र असलेल्या व आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयाकडून भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत.
शैक्षिणक वर्ष 2012-13 पासून महाविद्यालयात पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकृती केंद्र (ए.आर.सी.) ची सुविधा उपलब्ध केली आहे. 2013-14 पासून पदिवका अभ्यासक्रमांच्या अर्ज स्वीकृती केंद्रासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, उपाध्यक्ष सुमित जैन, सचिव कु. स्नेहल मिरगणे, शहा मामा, किरण आवटे, जगदिश मेहता, अँड. प्रकाश गुंड हे कामकाज पहात असून प्राचार्य डॉ.जे.सी.बुरसे व उपप्राचार्य मृगेंद्र अंधारे यांचे विशेष योगदान आहे.