बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील शासकिय विश्रामगृहात शिवसेना जिल्हा उपप्रमुख तात्या भँवर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दुष्काळाच्या परिस्थितीवर बैठक संपन्न झाली. यावेळी भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, दिपक आंधळकर, काका गायकवाड, मंगलताई पाटील, विक्की झव्हेरी यासह बार्शी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना तात्यासाहेब भँवर म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती असल्याने अनेक गावांना जनावरांच्या व पिण्याच्या प्रश्नाबाबत शासनाकडून मदत मिळावी, तालुका दुष्काळग्रस्त असल्याने दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, तसेच जनावरांच्या चार्यासाठी त्वरीत छावण्या सुरु कराव्यात यंत्राऐवजी मजुरांकडून कामे करुन रोजगार उपलब्ध करावा यासाठी चर्चा करण्यात आली. ज्या गावात महिलांच्या शौचालयाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी त्वरीत उपाययोजना करुन सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अनेक भागातील खराब रस्त्यांचा प्रश्न असल्याने दळणवळणात अडथळे निर्माण झाले आहेत. वैरणीवरील जिल्हाबंदीचे आदेश रद्द करावेत. सर्वसामान्यांस जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने काही ठिकाणी जाणीवपूर्वक पाणी व चार्यापासून वंचित ठेवले जाते याला जबाबदार असणार्या अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त केला जाईल. यापुढे तीव्र आंदोलने करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबध्द राहील. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा नियोजीत दौरा दि. 6 एप्रिल रोजी परंडा व बार्शी मार्गे सोलापूर असा असल्याने यावेळी राजकीय बदलाचे संकेतही मिळतील व काही प्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याने यापुढे आणखी बदलाचे संकेत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी भाऊसाहेब आंधळकर यांनी दुष्काळामुळे बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्याऐवजी शासनाला 1 लाख रुपयांची निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. प्रत्येक गाव पातळीवर शिवसेनेच्या शाखेची स्थापना होत असून लोकांचा स्वत:हून शिवसेनेत येण्याचा कल वाढत असल्याने यापुढे अतिशय चांगल्या पध्दतीची आखणी करुन समाजकार्य करण्यात येईल व लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बार्शी शहरात जनावरांच्या पाण्यासाठी पानवठा व माणसांना पाण्यासाठी पाणपोई तसेच टँकरची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.