बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील जामगाव रोडवरील सुरु असलेल्या राजलक्ष्‍मी तसेच रेणुका लोककला नाट्य केंद्रात तमाशाच्या नावाखाली डान्सबारपेक्षा भयानक अनैतिक प्रकार सुरु असल्याची तक्रार विक्की बाळासाहेब जव्हेरी यांनी जिल्‍हाधिकारी यांच्याकडे लेखी केली आहे.
              महाराष्ट्राची लोककला व सांस्कृतिक क्षेत्राचा ठेवा जतन करुन समाज प्रबोधन व लोकजागृती होण्यासाठी शासनाने मान्यता दिली असली तरी यामध्ये काही नियम व अटींची पूर्तता करण्याचे बंधन घातले आहे.
     विक्‍की जव्हेरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे की,  सदरच्या ठिकाणी असलेल्या कला संचात 9 पेक्षा जास्त संच आहेत, हिंदी अश्लिल गाण्यांचे कार्यक्रम बंद खोलीत रात्री उशीरापर्यंत सुरु आहेत. अल्पवयीयन मुली यात काम करत आहेत, मद्यपानाची सुविधा पुरविण्यात येते, बंद खोलीत बैठका सुरु आहेत, बैठकीसाठी 4100/- व 3100/- रुपये प्रती ताशी प्रमाणे एअर कंडिशन रुम्सची सुविधा पुरविली जाते, शासनाचा महसूल व कर चुकविला जातो, दररोज 1 लाखापेक्षा जास्त उलाढाल करुनही शासनाला केवळ चारशे ते पाचशे रुपयांचा व्यवहार दाखिवण्यात येतो, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी बाहेर लॉजमध्ये पाठिवण्यात येत असल्‍याचे विक्की जव्हेरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
     सदरच्या खुलेआम सुरु असलेल्या बेकायदा धंद्याने शासनाच्या उपक्रमाचे धिंडवडे काढण्याचे काम लोककला केंद्रचालक करीत असल्‍याचे नमूद करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी करण्‍यात आली आहे. सदरच्या बाबत शासनाची चौकशी सुरु असून अद्याप कोणत्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकत नाही.
     सदरच्या बाबत विक्की जव्हेरी यांच्याची आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता, अधिकार्‍यांना प्रत्येक महिन्याला ठरल्याप्रमाणे त्यांच्या हप्त्याची रक्कम मिळत असल्‍याने त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे छापे अथवा कठोर कारवाई केली जात नाही. तसेच यांनी संगणमताने वरिष्ठांना कळविलेले अहवाल ग्राह्य धरण्यात येतात. यासाठी खुद्द जिल्‍हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी बार्शीत येऊन वेशांतर करुन माहिती घेऊनच कारवाई केल्यास सदरच्या घटनेतील सत्य बाहेर येईल असे म्हटले आहे.
 
Top