उस्मानाबाद :- जिल्ह्यात सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना प्राधान्याने मार्गी लावा तसेच रोजगार हमी योजनेतंर्गत पाझर तलाव आणि जलसंधारणाची कामे हाती घ्या, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. 23 मार्च पालकमंत्री चव्हाण यांनी टंचाई परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदिंची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी पाणीटंचाईबाबत आणि त्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत तालुकानिहाय संबंधित तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. तात्पूरत्या नळ पाणीपुरवठा योजना, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची संख्या व तेथून मिळणा-या पाण्याची उपलब्धता, टँकर्सची संख्या, संबंधित तालुक्यातील उपलब्ध स्त्रोतातील पाणी साठा आदिंची माहिती घेतली. ग्रामीण भागात मागेल त्याला कामे उपलब्ध करुन द्या, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने कामाची गती वाढवावी, असे निर्देश श्री.चव्हाण यांनी दिले.
सध्या उस्मानाबाद शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने तात्काळ नागरिकांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. उजनी उद्भव योजनेच्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. हे काम तातडीने मार्गी लावून उस्मानाबादकरांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई विषयक विविध उपाययोजनांसाठी 4 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे सांगितले. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिमेंटचे हौद तसेच वन्यजीवांसाठी पाणवठ्यावर पाणी पुरविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत.त्यांच्या मदतीने अत्यावश्यक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतींनाही पाण्याच्या टाक्या विनामुल्य उपलब्ध करुन देण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने त्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उस्मानाबाद व भूमचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी व शोभा ठाकूर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता एम.एस.भालेराव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.कोटेचा यांच्यासह आठही तालुक्यांचे तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते.