
या मेळाव्यासाठी वधूची नोंदणी मोफत ठेवण्यात आली असून वराच्या नोंदणीसाठी 100/- शुल्क ठेवण्यात आले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने वधू-वरांची स्मरणिका काढण्यात येणार आहे. या स्मरणिकेसाठी संस्था हितचिंकांनी आपली जाहिरात देवून संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जुळे सोलापूर ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यातील इच्छुकांनी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष पत्रकार नागेश जोशी (मो. 9420703551), सोलापूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मानस कमलापूरकर (मो. 9423335988) यांच्याकडे त्वरीत संपर्क साधून आपले फॉर्म भरावेत, असे आवाहन जुळे सोलापूर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष डी.डी.कुलकर्णी यांनी तसेच ब्राह्मणसभा सांगोला तालुकाकार्याध्यक्ष श्रीकांत देशपांडे, उपाध्यक्ष अरूणकाका कुलकर्णी आदींनी पत्रकाद्वारे केले आहे.
यासंस्थेच्या वतीने 29 एप्रिल रोजी मोफत मौजी बंधन सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी मो. 9890874038 या नंबरवरती संपर्क करावा. तसेच या संस्थेच्यावतीने दि. 11 एप्रिल 2013 रोजी गुढीपाडव्या दिवशी संघाचा 10 वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.