उस्मानाबाद :- येथील इंजिनिअरींग कॉलेज, उस्मानाबादच्या पाठीमागे असणा-या वन जमिन परिसरात पोलीसांना एक अनोळखी बेवारस पुरुष इसम मृत अवस्थेत आढळून आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार त्याचे वय अंदाजे 55 वर्षे, उंची- 5 फुट 5 इंच, शरीरबांधा-मजबुत, अंगावर पांढरा शुभ्र ओपन शर्ट, अंगात काळी पँन्ट ,डोकीस काळी डाय केलेले केस, पायात लाल रंगाची चप्पल अशा वर्णनाचा बेवारस इसम मृत आढळून आला आहे. याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा.