उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हयाच्या  दौ-यावर येत असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
       शनिवार, दि. 23 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळयांचे अनावरण सदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी चर्चा.  दुपारी 12 वाजता तुळजापूर येथून उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता पाणीटंचाई/ दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ बैठक, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद व  सोईनुसार अणदूरकडे प्रयाण व आगमन.   
      रविवार, दि. 24 रोजी सकाळी 9-45 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण,  स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व  राखीव. स. 11 वा.  तुळजापूर खुर्द भागास मोफत पाणीपुरवठा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ - पाचुंदा सबस्टेश्‍न शेजारी लातूर रोड, तुळजापूर, स. 11-30 वा. राज्यस्तरीय वीरशैव वधु-वर परिचय मेळावा, ठिकाण - लोहिया मंगल कार्यालय, तुळजापूर, दु 2-30 वा. तुळजापूर येथून  अणदूरकडे प्रयाण, आगमन व राखीव, सायंकाळी 7 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.
 
Top