![]() |
जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे |
उस्मानाबाद -: नागरीकांनी पिण्याचे पाणी वापरतांना काळजी घ्यावी. ज्याठिकाणी पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी नागरीक अन्य स्त्रोतांतून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र नागरीकांनी पिण्याचे पाणी स्वच्छ असेल याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्या परिसरात टँकरने पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नगर परिषदेला देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी कळविले आहे.
शहराच्या नेहरु चौक भागातील काही रहिवाशांकडून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी नदीपात्रातील पाईपलाईन जवळील भागाचा वापर करण्यात येत होता. मात्र अशा प्रकारच्या पाण्याचे सेवन झाल्यास त्याचा अपाय होवू शकतो. त्यामुळे नागरीकांनी हे पाणी पिणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर तसेच इतर वरिष्ठ अधिका-यांसह याठिकाणी भेट देवून पाहणी केली. नगर परिषदेला या भागात तात्काळ टँकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यानी दिले.