सांगोला (प्रतिनिधी) :- ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2013-14 साठी एम.बी.ए.प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांना मे 2013 ची तिसरी सी.मॅट प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.
सदर परीक्षा 19 मे ते 22 मे 2013 या कालावधीत देशातील विविध 62 शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये प्रमुख आठ शहरांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. यापूर्वी प्रत्येक राज्यातील तांत्रिक शिक्षण विभागाकडून मॅनेजमेंट शाखेच्या प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जात होते. याचबरोबर खाजगी असोसिएशन मार्फतही प्रवेश परीक्षा घेतल्या जात होत्या.
गतवर्षी आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेत झालेल्या निर्णयानुसार सन 2013 पासून देशातील सर्व मॅनेजमेंट प्रवेशासाठी Common Management Admission Test (CMAT) लागू करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेचा पदवीधर असावा यासाठी ओपन उमेदवारास 50 टक्के व राखीव उमेदवारास किमान 45 टक्के गुणाची अट आहे. याचबरोबर पदवीच्या तिसर्या वर्षासाठी असणारे उमेदवारही पात्र ठरतील असे अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केले गेले आहे. त्यामुळे उचअढ परीक्षा देण्यासाठी जवळजवळ सर्वांना संधी मिळणार आहे.
या परीक्षेद्वारे मेरीट लिस्ट प्रसिध्द केली जाणार आहे.या परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे विषय व गुण विभागणी असेल. Quantitative techniques d data Interpretation- 25 प्रश्नासाठी 100 गुण, Language Comprehension 25 प्रश्नांसाठी 100 गुण, Logical reasoning 25 प्रश्नांसाठी 100 गुण आणि General Awareness 25 प्रश्नांसाठी 100 असे एकूण 400 गुणांची असेल. चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी 1 गुण वजा केला जाईल. परीक्षेचा कालावधी एकूण 3 तासाचा असेल आणि ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या सामाईक परीक्षेस बसण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत सध्या सुरू असून ती 10 मार्च ते 10 एप्रिल 2013 पर्यंत आहे. हॉल टिकेट प्रिंट ऑनलाईन सुविधा 3 मे 2013 पासून सुरू आहे. या परीक्षेसाठी ओपन उमेदवारास रू.1200 तर राखीव उमेदवारास रू. 600 एवढी फी आकारण्यात आलेली आहे. परीक्षा अर्ज ऑनला~www.aicte.cmat.in उपलब्ध आहे. त्यासाठी एकस्कॅन फोटो, स्कॅन सही, मोबाईल नंबर, व्हॅलीड ई-मेल खाते आणि क्रेडीट कार्ड किंवा बँक चलन इ.ची आवश्यकता आहे. पदवी पूर्ण केलेल्या आणि पदवीच्या तृतीय वर्षासाठी असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येतेकी, परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 10 एप्रिल 2013 पर्यंतच आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा असल्याने पुढील इंटरनेट समस्या टाळण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्ज लवकरात लवकर भरावा. परीक्षा फॉर्म (ऑनलाईन) कसा भरावा ? परीक्षा कशी असेल ? याविषयी मार्गदर्शन होणेसाठी इच्छुक उमेदवारांनी सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, कमलापूर, ता. सांगोला येथे संपर्क साधावा. याचबरोबर याठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधाही कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा.
संपर्क :- 8888883661, 9860148112,9970509059, 02187-222901, 283307.