नळदुर्ग -: महिलानी बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनून आपले कर्तृत्व इतराना प्रेरणादायी ठरावे यासाठी विशेष प्रयत्न करावे, महिलांच्या विकासासाठी शासन स्तरावरुन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी केले.
नळदुर्ग शहर भोई समाज यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा सत्कार सोहळा व महिला बचगटांचे भव्य स्टॉल प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र बोरगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय समारोप नरेंद्र बोरगावकर म्हणाले, महिलांनी आपल्या संरक्षणासाठी आधुनिकतेची कास धरत कराटे प्रशिक्षण सारखे अन्य प्रशिक्षण घ्यावे, असे सांगून महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
माजी नगराध्यक्षा निर्मलाताई गायकवाड, डॉ. सरोजा बोलडे, डॉ. स्मिता पुदाले, श्रीमती राणुबाई सपकाळ, महिला बालकल्याण सभापती सौ. सुप्रिया पुराणिक, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. सुमन जाधव, नगरसेविका अर्पणा बेडगे, सुफिया कुरेशी, मुन्वर कुरेशी, मंगल सुरवसे, कुशावर्ती शिरगुरे, तालुका दक्षता समिती सदस्या शाहेदाबी सय्यद आदींचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नळदुर्ग शहर भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे, नंदकुमार डुकरे, मंजुश्री डुकरे, अंबू भोई, गीता पुदाले, रमूबाई कौरव, दिपक डुकरे, प्रकाश दासकर यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले. त्यानंतर फित कापून महिला बचतगटांच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिका कविता पुदाले लिखित ‘अंतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, उपनगराध्यक्ष शहबाज काझी, नगरसेवक देविदास राठोड, नय्यर जहागिरदार, कमलाकर चव्हाण, कमलाकर डुकरे, भारतीय महिलाबचत, बिस्मिल्ला महिला बचत गट, रेणुका माता, नंदादीप सखी, प्रगती बचत गट, भाग्यशाली महिला बचतगट, वैभवलक्ष्मी महिला बचतगट यासह अनेक बचतगटांच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रियंका पुदाले यांनी तर सुत्रसंचालन कविता उकंडे, बाळू महाबोले, जितेंद्र मोरखंडीकर यांनी तर आभार सचिन डुकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पुदाले, नितीन पुदाले, अमृत पुदाले, विजय दासकर, सुभाष भोई, कल्पना सिध्दे, उमाबाई दासकर, उज्वला पुदाले, उषाबाई डुकरे यांनी परिश्रम घेतले.