बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जागतिक महिला दिनानिमित्त याही वर्षी भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका विजयश्री पाटील, सचिव गिरीष केसकर, ललीता चव्हाण, शुभांगी मनोहर कुलकर्णी, श्रीमती अलका किशोर आधटराव, सौ.सुरेखा पाटणे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलतांना संस्थाध्यक्ष मुरलीधर चव्हाण यांनी म्हटले, संस्थेचे भिवष्यातील नियोजन हे वृध्दाश्रमासारख्या गरजेच्या बनलेल्या उपक्रमासाठी कार्यरत आहे. यावेळी सौ. पाटील यांनी प्रसारमाध्यमांचा महिला तसेच समाजावर होणार्या परिणामबाबत विचार व्यक्त केले.
मंदाताई माने, शैलजाताई पाटील, सौ. मीना शिखरे, कु.रिना मठपती यांनी मनोगते व्यक्त केली. धुमाळ यांनी आभार तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.