बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : दुसर्या ग्रामीण होमिओपॅथीक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे पंधराशे डॉक्टर्स बार्शीला येऊन वैद्यकीय सोयी व उपयोगाबाबत चर्चा करणार आहेत.
सदरची परिषद ही दि. 21 एप्रिल रोजी बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे पार पडणार आहे. या परिषदेचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीप सोपल राहणार आहेत. पुणे येथील ख्यातनामतज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. दिपक जगताप, डॉ.श्रीकांत कुलकर्णी आदी तज्ञांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
यावेळी कोलकत्ता येथून प्राप्त झालेला जागतिक हानीमन पुरस्कार विजेते डॉ. कालिदास लिमकर यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच होमिओपॅथिक शास्त्राच्या प्रसारासाठी राज्यभर कार्य करणार्या तज्ञ डॉक्टरांचा गौरवही यावेळी करण्यात येत आहे. या कार्यशाळेत नवीन संशोधनावर तसेच ग्रामीण भागातील औषधोपचाराचा प्रचार आणि प्रसार याबाबत मार्गदर्शन व चर्चा सत्र होत आहे.
या पत्रकार परिषदेसाठी डॉ.संजय कोडलिंगे, डॉ.कृषा शेळवणे, डॉ.धनंजय भोरे, डॉ.देविदास इंगळे, डॉ.शरद इतापे, डॉ.शरद चिकणे, डॉ. प्रवीण वाघमोडे, डॉ. व्यंकटेश काबरा, डॉ.दत्ता विधाते आदि उपस्थित होते.