सोलापूर -: ग्राहकांमध्ये जागृती होण्याकरिता प्रत्येक विभागाने सर्वसामान्य ग्राहकांना विना त्रास आपल्या विभागाची संपूर्ण माहिती दिली तरच ख-या अर्थाने ग्राहकदिन साजरा करण्याचा उपयोग होईल, असे प्रतिपादन अन्न धान्य वितरण अधिकारी संतोष भोर यांनी केले.
जिल्हा पुरवठा कार्यालय, अन्न धान्य वितरण कार्यालय आणि ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात संतोष भोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद गायकवाड, ग्राहक पंचायत महिला अध्यक्ष शोभना सागर, पंढरपूर ग्राहक पंचायतीचे शशिकांत हरिदास, एस.टी.चे विभाग नियंत्रक थोरात उपस्थित होते.
भोर पुढें म्हणाले की, सर्वसामान्य ग्राहकांना एकत्रित येऊन ग्राहक कायदा तयार करावा लागला. या ग्राहक कायद्याचा सर्वांनी उपयोग करुन घेणे गरजेचे आहे. ग्राहक कायदा करुनही पाहिजे तेवढी जागृती ग्राहकांमध्ये अद्याप निर्माण व्हावयाची आहे. यासाठी प्रत्येकच शासकीय, निमशासकीय आणि विविध कार्यालयांनी स्वत:हुन त्यांची माहिती सर्वसामान्यांना दिली तर ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होईल.
श्रीमती शोभना सागर आपल्या भाषणात म्हणाल्या की, जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होणे ही आता काळाची गरज आहे. जाहिरातीच्या विळख्यात आणि बहुराष्ट्रीय कंपनींच्या जाळ्यात ग्राहक अडकला आहे. ग्राहक पंचयातीच्या माध्यमातुन ग्राहकांना मार्गदर्शन व ग्राहक न्याय मंचामधुन न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्या जात आहेत. ग्राहकांनीही त्यांची तक्रार करणे आवश्यक आहे. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदु असुन ग्राहकांनी ख-या अर्थाने जागृत झाले पाहिजे. सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
श्री. हरिदास म्हणाले की, ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवून काम केले पाहिजे. प्रशासनाला मदत करणारी ग्राहक पंचायत ग्राहकांना न्यायही मिळवून देते. ग्राहक पंचायत व प्रशासन यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले तर ग्राहक जनतेचे प्रश्न मिटतील व त्यांना न्याय मिळेल.
कार्यक्रमात लावण्यात आलेल्या स्टॉलचे उदघाटन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.