उस्मानाबाद -: कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या मानधनी कनिष्ठ अभियंता व लिपीक टंकलेखक या पदाच्या लेखी परिक्षा दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील मानधनावरील कंत्राटी कनिष्ठ अभियंता व लिपीक टंकलेखक या पदाची जाहिरात प्रसिध्द करुन पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आलेली असून लेखी परिक्षेसाठी पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जदाराची यादी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, उस्मानाबाद कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच www.osmanabad.nic.in वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. सर्व पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहेत. पात्र उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून परीक्षा दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.