सांगोला (राजेंद्र यादव) -: सध्‍या व्‍यवस्‍थापन शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्‍ये अपेक्षित असणारी कौशल्‍ये यामध्‍ये बरेच अंतर आहे. हे अंतर आज कमी करण्‍याी गरज आहे. म्‍हणून विद्यापीठ स्‍तर आणि औद्योगिक क्षेत्र यांनी एकत्र येऊन मागणीनुसार अपेक्षित कौशल्‍यांचा विकास अभ्‍यासक्रमाद्वारे करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे प्रत्‍यक्ष शिक्षण आणि उद्योजकांच्‍या अपेक्षा यातील अंतर कमी होईल, असे प्रतिपादन सोलापूर येथील प्रसिध्‍द उद्योजक व प्रिसिजन कॅमशापटचे अध्‍यख यतीन शहा यांनी व्‍यक्‍त केले.
    सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, कमलापूर (ता. सांगोला) येथे शनिवार दि. 16 मार्च रोजी चौथ्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन सोलापूर येथील प्रसिध्‍द उद्योजक व प्रिसिजन कॅमशापन्‍टचे अध्‍यक्ष यतीन शहा यांच्‍या हस्‍ते झाले. उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंहगड संस्‍थेचे उपाध्‍यक्ष प्रा. एस.एन. नवले, सचिव संजय नवले, डॉ. व्‍ही.एस. मंगनाळे, डॉ. मिनेश आडे आदीजण उपस्थित होते.
    दरवर्षीप्रमाणे सिंहगड इन्स्टिटयुट कमलापूर येथे राष्‍ट्रीय परिषिदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावर्षी देशभरातील विविध भागातून व्‍यवस्‍थापनावर साठ शोध निबंध आलेले आहेत. त्‍याचबरोबर विद्यार्थ्‍यांनीही जवळपास चाळीस विविध विषयात संशोधन करुन पेपर्स तयार केलेले आहेत. विद्यार्थ्‍यांचे संशोधन पेपर्स तयार करण्‍यासाठी एम.बी.ए. आणि एम.सी.ए. च्‍या सर्व प्राध्‍यापकांनी मार्गदर्शन केले. या परिषदेच्‍या उदघाटनामध्‍ये यासर्व संशोधनाच्‍या अहवालांचे प्रसिध्‍दीकरण यतीन शहा व सौ. सुहासिनी शहा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमात शहा यांनी व्‍यवस्‍थापन शिक्षण हे चालू उद्योग कौशल्‍याशी निगडीत असावे. यासाठी व्‍यवस्‍थापन महाविद्यालय आणि विविध उद्योग यामध्‍ये आंतरक्रिया व्‍हावी आणि उद्योजकांच्‍या अपेक्षेनुसार शिक्षणात बदल करुन गुणवत्‍ता वाढविण्‍यास मदत करावी, असे मत मांडले. याप्रसंगी त्‍यांनी एम.बी.ए. च्‍या विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून त्‍यांना बदलत्‍या जगाविषयीची जाणीव करुन दिली. त्‍याचबरोबर विद्यार्थ्‍यांनी एम.बी.ए. झाल्‍यानंतर कार्य केले पाहिजे, याविषयीही त्‍यांनी मार्गदर्शन केले.
    या परिषदेचे औचित्‍य साधून सिंहगड इन्स्टिटयुटमध्‍ये विद्यापीठ मान्‍यताप्राप्‍त संशोधन केंद्राचे उदघाटन सौ. सुहासिनी शहा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेही या केंद्रामार्फत पी.एच.डी. साठी प्रवेश घेतलेले सर्व संशोधक हजर होते. या परिषदेमध्‍ये विविध संशोधनाचे सादरीकरण होणार असून व्‍यवस्‍थापनातील विविध समस्‍यांवरती चर्चा होणार आहे. ही परिषद यशस्‍वी करण्‍यासाठी प्रा. भोईटे, प्रा. उपाध्‍ये, प्रा. खडतरे व इतर प्राध्‍यापक यांनी काम केले.
 
Top