सांगोला (राजेंद्र यादव) -: दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करुन आहे त्या पाण्यावर पिक पध्दतीत बदल करुन क्षारयुक्त पाण्यावर येणारे शेवग्याचे पीक घेवून भरघोस उत्पन्न सांगोला येथील प्रगतशील शेतकरी अनिरुध्द पुजारी व त्यांचे बंधू उपेंद्र पुजारी यांनी मिळवले आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करीत व आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पुजारी यांनी आपल्या शेतातील 12 एकर क्षेत्रात शेवग्याचे पिक घेतले. या 12 एकरात 9 हजार शेवग्याची रोपे त्यांनी लावली. रोहित जातीच्या या शेवग्याने त्यांना चांगलीच साथ दिली.एकरी 50 हजार रुपये खर्च केल्यानंतर जवळपास 1 ते सव्वा लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळणे अपेक्षित आहे.
शेवग्याची लागवड त्यांनी 15 जून ते 15 जुलै 2012 या कालावधीत केली. एकरी चार ट्रॉली शेणखत, सुक्ष्मअन्नद्रव्ये एकरी 25 किलो, डी.ए.पी. 5 पोती असे खत घालून त्यांनी ही रोपे मोठी करुन पिक हाती घेतले. लागवडीनंतर सहा महिन्यात उत्पन्नाला सुरुवात झाली. सध्या सरासरी आठवड्याला दहा टन शेंगा वाशी,मुंबईच्या मार्केटला जात असून आजपर्यंत सरासरी 22 रुपये किलो असा दरही त्यांना मिळाला आहे. जेव्हा मार्केटला शेवगा कमी होता तेव्हा उच्चांकी दर प्रतिकिलो 80 रुपये दर त्यांनी मिळवला आहे. या पिकातच त्यांनी आंतरपिक म्हणून झेंडूचे पिक घेतले. त्यातही त्यांना फायदा झाला. एका किलोत 13 ते 15 शेंगा बसतात. 15 इंच किंवा त्याहूनही जास्त लांबीच्या या शेंगा खायला चविष्ट, आकर्षक पोपटी रंगाच्या व गरेदार असल्यामुळे त्यांच्या या शेंगांना मार्केटमध्येही मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नेहमीच आपल्या शेतात विविध प्रयोग करुन विविध फळे, भाज्यांचे पीक घेणार्या पुजारी यांना शेवगा पीक घेण्यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, शेवगा हे पिक कमी पाण्यात तसेच क्षारयुक्त पाण्यात येणारे पीक असल्याचे माहित झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एका शेतकर्यांकडून रोहित जातीची रोपे आणून ती आधी लावली त्यानंतर त्यांपासून आणखी रोपे तयार करुन 12 एकरात ही लागवड केली. इतर फळे, भाज्यांच्या लागवडीसाठी दुष्काळामुळे पाण्याची उपलब्धता होत नसल्याने शेवगा पिकाचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
पुजारी यांनी यापूर्वी पपई, कलिंगड, ढोबी मिरची, काकडी यासारख्या फळभाज्यांचेही चांगले उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचा फायदा तालुक्यातील इतर शेतकर्यांनाही होत आहे. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नेहमीच त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत असतात.