सांगोला (राजेंद्र यादव) -: फॅबटेक एज्‍युकेशन सोसायटीचे सांगोला येथील कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँन्‍ड रिसर्च येथे विद्यार्थ्‍यांसाठी उपयुक्‍त असे कॅम्‍पस प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. या व्‍याख्‍यानमालेचे पुष्‍प प्रा. धायगुडे (वालचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरींग, सांगली) यांच्‍या प्रेरणादायी व मार्गदर्शक व्‍याख्‍यानाने गुंफले गेले.
    विविध कंपन्‍यांच्‍या एका इंजिनियरकडून असणा-या अपेक्षा आणि त्‍या पूर्ण करण्‍यासाठी अभियांत्रिकीच्‍या विद्यार्थ्‍यांनी करावयाचे प्रयत्‍न यावर प्रकाश टाकून कंपन्‍यांकडून निवड प्रक्रियेत घेण्‍यात येणा-या अँप्टिटयूड टेस्‍टचे स्‍वरुप व ती उत्‍तीर्ण होण्‍यासाठी करावयाची तयारी यावर अधिक भर देवून प्रा. धायगुडे यांनी विद्यार्थ्‍यांशी सुसंवाद साधला. स्‍पर्धात्‍म युगात या तयारी साठी लागणारी उत्‍तम पुस्‍तकांची नावे देख यावेळी अधोरेखीत केली. याही पुढे जावून अभियांत्रिकीच्‍या विद्यार्थ्‍यांनी कटाक्षीने आत्‍मसात करावयाची कला म्‍हणजे स्‍वसादरीकरणाची कला होय, असे मत प्रा. धायगुडे यांनी व्‍यक्‍त केले.
    विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण तयारीचा पाया म्‍हणून फॅबटेक कॉलेजने उचलेले 'सॉफ्ट स्‍कील्‍स डेव्‍हलपमेंट कार्यशाळा' राबवण्‍याच्‍या पावलांचे त्‍यांनी कौतुक केले. शिक्षणानंतरच्‍या बाहेरील स्‍पर्धात्‍मक जगात जिंकण्‍यासाठी कंपन्‍याची गरज जाणून घेऊन त्‍या दिशेने प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी विद्यार्थ्‍यांना केले असता आमच्‍या कॉलेजने आमच्‍या तयारीसाठी उंचावलेल्‍या सर्व प्रयत्‍नांना आम्‍ही साथ देऊ, असे एकमताने उच्‍चारले.
    कॉलेजनचे प्राचार्य डॉ. सतीश तानवडे यांनी उपस्थित मान्‍यवरांची ओळख विद्यार्थ्‍यांना करुन देण्‍यासोबतच मान्‍यवरांच्‍या मौल्‍यवान मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. सौ. नितीशा काळोखे यांनी उत्‍तम रित्‍या पार पाडले.
 
Top