.jpg)
पंढरपूर :- सोलापूर जिल्ह्याला अभुतपूर्व दुष्काळाचा सामना करावा आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी असल्याने येथील फळबागा वाचविण्यासाठी केद्रं सरकाच्या वतीने सरसकट हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा केद्रिंय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील जवळा येथे केली.
शनिवार दि. 16 मार्च रोजी केद्रिंय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील जवळा, तरंगेवाडी, वाणी चिंचाळे येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी शरद पवार यांनी चारा छावणीतील पशु पालकांशी संवाद साधताना, जनावरांना चारा किती मिळतो ? तो पुरेसा आहे का ? आदी प्रश्न विचारले. यावर तरंगेवाडी येथील चारा छावणीतील पशुपालक श्रीमती. कमल खांडेकर यांनी चारा व्यवस्थित मिळतो असे सांगितले तसेच पवार यांनी सिंमेट बंधारे बांधण्याच्या कामालाही भेट देऊन जिल्ह्यात पाणलोटाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावा अशी सुचना संबधित अधिका-यांना केली.
कृषीमंत्री शरद पवार पुढे म्हणाले की, छावण्यामधील मोठ्या जनावरांसाठी दररोज 50 रुपये तर लहान जनावरांसाठी प्रत्येकी 25 रुपयांची मदत केली जाईल. त्याच बरोबर 2 हेक्टर कोरडवाहू जमिनीसाठी प्रत्येकी 4 हजार 500 रुपये तर ओलिताखालील 2 हेक्टर जमीनीसाठी प्रत्येकी 9 हजार रुपयांची आर्थिक मदत शेतक-यांना देण्यात येईल. दुष्काळा निर्मूलनाबाबत पक्ष विरहीत कामाला प्राधान्य देण्यात येणार असुन दुष्काळाबाबत कोणीही राजकारण करु नये, असे आवाहनही ना. पवार यांनी केले.
तत्पूर्वी सांगोला अभियांत्रिकी विद्यालयात पवार यांनी जिल्हास्तरीय प्रमुख अधिका-यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती घेतली.
जिल्ह्यात 354 टँकर सुरु असून याव्दारे 281 गावांना व 1534 वाड्यांना पाणी पुरवठा सुरु आहे. मनरेगाच्या 567 कामांवर 7546 इतके मजुर काम करीत आहेत. तसेच 156 चारा छावण्या मध्ये सुमारे 1 लाख 40 हजार नांवरे असुन दुष्काळ निर्मूलनाबाबत जिल्ह्याला 131 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी आढावा बैठकीत दिली.
याप्रसंगी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जि.प अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी, जेष्ठ आमदार सर्वश्री. गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, हनुमंतराव डोळस, दिपकआबा सांळुखे पाटील, उदय सामंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ.शहाजी पाटील, एस.टी. महामंडाळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.