बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राज्य रस्त्यालगत रहिवास करणार्या नागरिकांना रोडलगत जादा अंतर सोडावे लागत असल्याने बांधकामास कायदेशीर अडचणी होत होत्या त्या बायपासमुळे संपुष्टात आल्या आहेत.
बार्शी नगरपालिका हद्दीतील कुर्डूवाडी लातूर रस्त्याचा साखळी क्रमांक 125/450 ते 131/210 (एकूण 5.76 कि.मी. लांबी) हा राज्य रस्ता क्र.145 मध्ये समाविष्ट होता. सद्यस्थितीत वळण मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 207 (सा.क्र.123/800 ते 135/0) तयार झाला असून तो कार्यान्वित झाला आहे. दि. 9 मार्च 2001 च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद-5 नुसार वर्गीकृत रस्त्यासाठी वळणरस्ते पूर्ण झाल्यावर नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक विभागाचे रस्ते त्यांच्या ताब्यात देण्याच्या सूचना आहेत. मुख्य अभियंता सा.बां.प्रा.वि. यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सदरचा रस्ता अवर्गीकृत केला आहे. याबाबत शासनिनर्णय क्र.संकीर्ण- 2009/प्र.क्र.72/िनयोजन-2 नुसार आदेश काढण्यात आले आहेत.
पूर्वीचा या शहरातून जाणार्या भागाला अंतर्गत रस्त्याचा दर्जा प्राप्त झाल्याने बार्शी शहरातील नागरिकांना राऊत सोपल यांच्या मतभेदातूनच आपले काम रखडल्याच्या शंकेला पूर्णविराम मिळाला आहे. मधल्या काळात सदरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती परंतु हा रस्ता नगरपालिकेच्या मालकिचा नाही असे नगरपालिकेचे मत आणि हा रस्ता आमच्या मालकीचा नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मत झाल्याने सदरच्या रस्त्याला कोणीच वाली नव्हते. रस्त्याची डागडुजी टोल वसूल करणार्या ठेकेदाराने करायची की नगरपालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग यातच कित्येक दिवस नागरिकांना धूळ खावी लागली व त्यांच्या आरोग्याशी खेळ झाला होता. काहींनी तर या रस्त्यावर जास्तीतजास्त राऊत यांचे समर्थक असल्याने जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार सांगीतली. तर काहींनी कागदावरच रस्ते झाल्याचे म्हटले होते.
सदरच्या अवर्गीकृत झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना जादा सोडाव्या लागणार्या रस्त्याऐवजी आता कमी अंतर सोडावे लागणार असल्याने बांधकामास बदलत्या शासकीय नियमानुसार फायदा झाला आहे.