सांगोला (राजेंद्र यादव) : निरा उजवा कालवा कि.मी. 114 ते कि.मी.169 मध्ये तात्काळ अस्तरीकरण सुरू करावे या मागणीसाठी सांगोला तालुका सर्वपक्षीय पाणी संघर्ष समितीच्या वतीने सांगोला शहरासह 32 गावात बुधवारी कडकडीत बंद पाळून अंदोलन करण्यात आले.
निरा उजवा कालव्यास अस्तरीकरण करुन गळतीचे वाचलेले 2 टी.एम.सी. पाणी सांगोला शाखा क्र.5 ला मिळणार आहे. या पाण्यामुळे गावातील शेतीला व पिण्याच्या पाण्यास दिलासा मिळणार आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून निरा उजवा कालवा कि.मी. ते कि.मी. मध्ये कालव्यास अस्तरीकरण करण्यास चिकमहुद, महुद बुद्रूकसह आदी भागातील शेतकर्यांचा कडाडून विरोध आहे. तर गावातील लाभधारक शेतकर्यांनी कालव्यास अस्तरीकरण व्हावे व लवकरात लवकर पाणी मिळावे या मागणीसाठी सांगोला तालुका सर्वपक्षीय पाणी संघर्ष समिती गठीत केली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी गावात ग्रामसभेच्या माध्यमातून पाण्यासाठी जनजागृतीची चळवळ उभी केली आहे. शिवाय या समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून अस्तरीकरण करावे व अस्तरीकरणातून वाचलेले पाणी मिळावे अशी निवेदने केली आहेत. शिवाय दोनवेळा तहसील कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले आहे. मात्र चिकमहुद, महुद बुद्रूकसह आदी भागातील शेतकर्यांचा विरोध व अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे अस्तरीकरणास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ अंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बुधवारी 32 गावे व सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद सर्वपक्षीय असल्यामुळे त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.