नळदुर्ग -: घरकुलासाठी मंजूर झालेल्‍या निधीचा उपयोग लाभार्थ्‍यांनी इतर कामासाठी न करता त्‍या निधीचा वापर घर बांधण्‍यासाठीच करावे, असे प्रतिपादन नळदुर्ग नगरपरिषदेचे उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी नळदुर्ग शहरातील साठे नगर येथे घरकुल बांधकामाच्‍या शुभारंभ प्रसंगी केले.
      नळदुर्ग येथील गरीब होतकरु 48 लाभार्थ्‍यांना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले असून साठे नगर येथील लाभार्थ्‍याच्‍या घरकुलाचे भूमीपूजन करण्‍यात आले. घरकुल योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण व जिल्‍हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्‍या हस्‍ते घरकुल मंजुरीच्‍या प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले होते. सोमवारी साठेनगर येथे मंजूर झालेल्‍या घरकुलाच्‍या बांधकामाचा शुभारंभ नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी न.प.चे मुख्‍याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर सुरवसे, नगर अभियंता स्‍वप्‍नील काळे, मातंग समाजाचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, संदीप सुरवसे, सलीम शेख, सुभाष गायकवाड, धनराज गायकवाड, राम गायकवाड, राजेंद्र काळे, विश्‍वनाथ गायकवाड, आदीजण उपस्थित होते.
 
Top