सांगोला (राजेंद्र यादव) : चोरट्यांना डाळिंबाचा वाढता दर चांगलाच माहित झाल्याने आता त्यांनी आपला मोर्चा डाळिंब बागांकडे वळविला आहे. महिम (ता. सांगोला) येथील शेतकरी नारायण बाजारे यांच्या बागेतील 85 हजार रुपये किंमतीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
      महिम येथील नारायण रामचंद्र बाजारे यांची निरा उजवा कालव्याजवळ 42 एकर शेतजमीन असून आठ एकरावर भगवा वाणाची डाळिंब लागवड केली आहे. शेतकरी डाळिंब बागा जोपासताना कमी पाणी महागडी औषधे वापरून व काबाड कष्ट करुन डाळिंब पिक घेण्यासाठी धडपड करीत आहेत. नारायण बाजारे यांची आठ एकरात सहाशे भगव्या वानाच्या डाळींबाची झाडे असून त्यांनी पहिल्या बहाराचे पिक घेतले असून दुसरा बहार धरलेले 11 क्विंटल सुमारे 85 हजार रूपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्यानी रविवारी मध्यरात्री तोडून चोरून नेले आहेत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नारायण बाजारे यांचा मुलगा मनोज बाजारे डाळिंब बागेत गेला असता त्यास झाडांची फळे गायब असल्याचे दिसले. नारायण रामचंद्र बाजारे यांनी सांगोला पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
 
Top