दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना पाणीटंचाईने हैराण झाली आहे. अशातच जनतेला लूटण्यासाठी नळदुर्ग व परिसरातील काही व्यापा-यांनी नामी शक्कल लढवून खाद्य पदार्थामध्ये भेसळ करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अन्न व औषध भेसळ विभागास सांगूनही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्वसामान्य जनतेतून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग शहराशी दैनंदिन व्यवहारासाठी परिसरातील 60 ते 75 गावांचा दररोज संपर्क आहे. साहजिकच नळदुर्गची बाजारपेठ वरील गावच्या ग्रामस्थांना सोयीची ठरते. तर येथील आठवडी बाजार रविवारी भरतो. परिसरातील मोलमजूरी करणा-या सर्वसामान्य जनतेसह मोठ्याप्रमाणावर ग्रामीण भागातील ग्रामस्थ नळदुर्ग बाजारपेठेवर अवलंबून आहे. मागील गेल्या काही आठवड्यांपासून खाद्य पदार्थांसह पेट्रोल, डिझेल यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत असतानाच काही व्यापा-यांनी खाद्य पदार्थामध्ये खुलेआम भेसळ करुन अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने विक्री करीत आहेत.
काही व्यापा-यानी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व उच्च दर्जाचे खाद्य पदार्थ आपणाकडेच असल्याचे चढाओढीने दाखविण्यासाठी चक्क नैसर्गिक असलेल्या मोहरी, बडीशोप यास कृत्रिम रासायनिक रंग लावून खुलेआम विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर खसखसमध्ये रवा मिसळून विकले जाते. तर मीठ पावडरमध्येही भेसळ करीत असल्याचे निदर्शनास आले असून भेसळयुक्त मीठ अजिबात खारट नसल्याची गृहिणीची तक्रारी आहेत. त्याचबरोबर शहर व परिसरातील अनेक हॉटेल, ढाब्यावर शिळे व दर्जाहीन जेवण दिले जात असून दोन ते तीन दिवसापूर्वीचे मांसाहारी जेवण ग्राहकाना देऊन आर्थिक लूट करीत असल्याचे ग्राहकातून चर्चा आहे. दरम्यान याप्रकरणी उस्मानाबाद येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास अनेकदा तोंडी सांगून वरील प्रकरणी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाई न करण्याचे गौडबंगाल काय आहे? दरमहा बंद पाकीट संबंधिताकडून दिले जात असल्यामुळे दोषीवर कारवाई होत नाही का? याबाबत ग्राहकातून उलटसुलट जोरदार चर्चा होत आहे. तात्काळ याप्रकरणी चौकशी करुन दोषीविरूद्ध अन्न व औषध प्रशासन आयुक्तानी कारवाई करावी व भेसळ करणा-याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहकातून होत आहे.