उस्मानाबाद -:  जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, उस्मानाबादची माहे मार्च, 2013 मधील बैठक दि. 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे बैठक कक्षात ठेवण्यात आलेली आहे. या  दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकुन घेण्यात येतील. तरी सर्व कार्यालय प्रमुख, अशासकीय सदस्य व नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                              
 
Top