
सध्या दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना भव्य देखावा, होर्डींग्स, कटआऊट, हारतुरे यांचा वापर कार्यकर्त्यांकडून यावर्षी होऊ नये, अशी अपेक्षा सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केली असल्याने यावर्षी वाढदिवस साधेपणाने समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दोन हजार लिटरच्या 107 सिंटेक्स टाक्क्यांच्या माध्यमातून 107 गावांना पाणीवाटप व जनावरांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याचे 107 सिमेंटचे हौद वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावांना इतर साहित्यांचे वाटप करुन हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आदी प्रश्नांनी शेतक-यांसह नागरीक त्रस्त आहे. त्यामुळे वरील आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे काही प्रमाणात का होईना जनतेला दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.