उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला. यात दिवाणी स्वरुपाची 428, फौजदारी स्वरुपाची 203 तसेच मोटार अपघात आणि कामगार नुकसान भरपाईची 33 न्यायप्रविष्ठ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मोटार अपघात आणि कामगार नुकसान भरपाई प्रकरणात 85 लाख 67 हजार 932 रुपये भरपाई देण्यात आली.
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश शशिकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते या महालोकअदालतीचे उदघाटन झाले.यावेळी जिल्हा न्यायाधिश बी.एस. महाजन,विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, जिल्हा सरकारी वकील, व्ही.बी. शिंदे, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश पी.बी.मोरे यांच्यासह विमा कंपनी अधिकारी, शासकीय यंत्रणाचे प्रमुख, विधिज्ञ यांची उपस्थिती होती.
    या महालोकअदालतीत महाराष्ट्र बँक, बी.एस.एन.एल, एस.बी.एच आणि अलाहाबाद बँकेची 236 वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिळविण्यात आली. यात 8 लाख 15 हजार 26 रुपयांची वसूली झाली.     महालोकअदालीतीच्या ठिकाणी नगर परिषदेच्यावतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित पक्षकारांनी याचा लाभ घेतला.
 
Top