उस्मानाबाद :- भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने 18 मार्च रोजी सकाळी 11-30 वाजता टेलिफोन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुरध्वनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून ग्राहकांनी प्रलंबित असणा-या देयके, नवीन टेलिफोन जोडणी, टेलिफोन बसविण्याचे साहित्य पुरविण्यास होणाऱ्या विलंबाबाबतच्या तक्रारी, टेलिफोनच्या सेवाबाबत काही  तक्रारी असल्यास त्या त्यांनी  लेखीस्वरुपात 11 मार्चपर्यंत बीएसएनएलच्या सांजा रोड येथील कार्यालयात पाठवाव्यात.
         तक्रारी पाठविताना स्वत:चे नाव व पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक नमूद करावा, असे आवाहन उपमंडळ अभियंता (वाणिज्य), बीएसएनएल, प्रशासनिक  भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी केले आहे.          
 
Top