सांगोला (राजेंद्र यादव) : सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेवून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आगामी काळात विकासकामे मार्गी लावली जातील, असे सांगून शहरात हाती घेतलेली विविध विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी मी स्वत: लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आ. गणपतराव देशमुख यांनी विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
    सांगोला शहरातील सुमारे 4 कोटी 56 लाख खर्चून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते व आ. दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, नगराध्यक्ष मारुती बनकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडला. कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब मस्के, शेकापचे तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, शहर चिटणीस भारत बनकर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, अनिल खडतरे, डॉ. प्रभाकर माळी, गोविंदराव जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी. डी. जाधव, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, उपनगराध्यक्ष अरुण बिले, बांधकाम समितीच्या सभापती ज्योती घोंगडे, आरोग्य समितीच्या सभापती प्रतिभा सपाटे, पाणी पुरवठा सभापती मधुकर कांबळे, महिला व बालकल्याणच्या सभापती वैशाली झपके, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, औदुंबर सपाटे, नगरसेवक नवनाथ पवार, दामोदर नरुटे, शिवाजी बनकर, सुहास होनराव, अरुण बोत्रे, इमाम मणेरी, नगरसेविका शोभा फुले, रेश्मा बनसोडे, डॉ. तस्कीन तांबोळी, सरस्वती रणदिवे, अरुणा इंगोले, संजीवनी शिंगाडे, माजी नगरसेवक सुभाष गावडे, निवृत्ती फुले, आनंद घोंगडे, मनोज सपाटे, बाळासाहेब झपके, दीपक बनसोडे, प्रा. संजय शिंगाडे, बशीर तांबोळी, रावसाहेब इंगोले, माजी नगराध्यक्ष भाऊसो बिले, सोपान बिले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.
    आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमात मिरज रोड येथे बहुरुपी व कैकाडी वसाहतीमध्ये 6 लाख 98 हजार खचरून सभागृह बांधकाम, शहरातील भाजी मंडई अंतर्गत विविध रस्ते 6 लाख 37 हजार खर्चाचे कॉंक्रीट करणे, पुजारवाडी येथे 8 लाख 25 हजार 566 रुपये खर्च करुन सटवाई मंदिरासमोरील सभामंडप बांधकाम करणे तसेच सुमारे 2 कोटी 27 लाख रुपये खर्चाच्या मिरज रेल्वे फाटक उत्तरेस पार्क अँण्ड स्पोर्ट कॉम्प्लेक्स ते इंदिरा नगरपर्यंतच्या रेल्वेलाईनचा पश्चिमेकडील रस्ता विकसित करण्याच्या विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मुस्लिम गल्ली समाज मंदिरावर 8 लाख 46 हजार 438 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अभ्यासिकेचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
     दलित वस्तीमधील साठे नगरमध्ये समाज मंदिर व परिसरासाठी सुमारे 4 लाख 65हजार रुपये खचरून केलेल्या सुशोभिकरण, अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत सुमारे 54 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणा-या अग्निशामन अधिकारी परिवेक्षक निवासाचे तसेच सांगोला शहरातील रिंगरोड रस्त्याचे 63 लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणार्‍या रस्त्याचे शिवाजी चौकात भूमिपूजन करण्यात आले. यु.आय.डी.एस.एम.एम.टी.योजनेअंतर्गत सांगोला शहरात सुधारित शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या वाढेगांव रोड, चिंचोली रोड पाण्याच्या टाक्यांचे वितरण व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. मिरज रोडवरील नवीन वसाहतीत, अंबिका मंदिराजवळील पाण्याच्या टाकीचे व पंढरपूर रोडवरील सावंत वस्ती येथील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील हाती घेण्यात आलेली विविध विकासकामे तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन आ. गणपतराव देशमुख यांनी दिले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top