उस्मानाबाद :- राज्य निवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते की, मार्च-2013 चे निवृत्ती वेतन, आयकर कपात करणे, हयातीचे दाखल्यांच्या संगणक प्रणाली, हयातींच्या नोंदी घेणे तसेच महागाई भत्ता माहे जुलै 2012थ ते ऑक्टोबर 2012 या 4 महिन्याच्या फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनाचे अनुदान मंजूर करुन निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात रक्कम  दि. 8 एप्रिलपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याची निवृत्त वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार  अधिकारी,  उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top