उस्मानाबाद :- आजी-माजी सैनिक, विधवांच्या पाल्याना सूचित करण्यात येते की, मद्रास इंजिनिअरींग ग्रुप व सेंटर बेंगलूर येथे सोमवार दि. 1 एप्रिलपासून सोल्जर टेक्निकल, सोल्जर जीडी व सोल्जर ट्रेडसमन पदसाठी युनिट हेटर्क्वार कोटा येथे  सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिककल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.
         या मेळाव्यात आजी-माजी सैनिक,विधवांच्या पाल्यांची व माजी सैनिकांच्या भावासाठी भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी मद्रास इंजिनिअरींग ग्रुप व सेंटर बेंगलूर येथे भरतीसाठी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा येथे दि. 2 एप्रिलपासून सैन्यभरती   

उस्मानाबाद :- आजी-माजी सैनिक,विधवांच्या पाल्याना सूचित करण्यात येते की, मंगळवार दि. 2 एप्रिलपासून सिग्नल ट्रेंनिंग सेंटर बांबोलियम, गोवा येथे युनिट हेडक्वार्टर कोटा येथे  सैन्यभरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
         या मेळाव्यात आजी-माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांची व आजी सैनिकांच्या भावासाठी भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी गोवा येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top