बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विविध नवनवीन संकल्पना राबवत असतांना ज्येष्ठ नागरिकांना ५०% रक्त देण्याचा मनोदय बार्शी येथील रामभाई शहा रक्तपेढीने केला आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही देशभरात सामाजिक कार्यासाठी काम करित आहे. याच्या उपशाखेच्या संचलित श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी आहे व तालुक्याच्या ठिकाणची असलेली पहिली पेढी आहे. मागील 35 वर्षांपासून अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे कार्य करणारी व नावलौकीक असलेली ही संस्था आहे.
येणारी तुट भरुन काढण्यासाठी नागरिकांकडून ऐच्छिक देणग्या गोळा करण्यात येत आहेत. बार्शीतील संस्थेचे सचिव डॉ. काका सामनगावकर यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीनिमित्त 50 हजार रुपयांचा धनादेश देऊन चांगली सुरुवात करुन दिली आहे.
या योजनेत वर्षातून जवळपास 3 हजार रुग्णांना याचा लाभ होणार आहे. शहरातील प्रमुख दवाखान्यांत रक्तपेढीच्या तज्ञांची नेमणूक करण्यात आली असून रुग्णांना विना कटकटीचा रक्तपुरवठा होण्यास व विना हेलपाटे तात्काळ रक्तपुरवठ्यासाठी सदरचा निर्णय घेतला असून गरिब व गरजूंचा वेळ व पैसा यामुळे वाचत आहे. शंभर टक्के रक्ताचे विघटन करुन रक्तपुरठा करणारी ही एकमेव रक्तपेढी आहे.