महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .
'' नादारीचे दिस कष्ट केले जीवापाड
निंदणी खुरपणी काय सांगाव पवाड
शेती काटे कुटे तरी भरली ग ओटी
घामाची कमाई माज्या लेकरांच्यासाठी
दुबळ्यापणाला नभ बाळांनो उगमगू
चांदसुर्यावरची बाई जात्यालीग ढगू
शिका रे बाळांनो धीट व्हावा दुनियेत
जड माझं जातं आसू सांडती पिठात ''
दोन दगडी जात्यांच्या पाळुंमध्ये भरडल्या आयुष्याचं गाणं- ओवी गाणारी आई. विठाई. या विठाईनं जन्मासोबतच दु:ख दारिद्रयाचं भरडल्या आयुष्यांची कविता - कवितेचा शब्द दिला. जगाचं शहाणपण सगळं काही ठाव असलेलं हे आईचं विद्यापीठ. हेच यशवंतराव चव्हाणांचं पहिलं विद्यापीठ. आई गेली तेंव्हाची भरभरून दु:खानं ओथंबलेली त्यांची वाक्यं दोनच वाक्य म्हंजे कारूण्य कवितेचं महावाक्य. या आईवडिलांच्या दु:खाचा यातनांचा कष्टांचा आणि त्यातूनच गिळाव्या लागलेल्या अपमानांचा कधीच विसर पडला नाही, त्याचा बभ्राही कधी केला नाही. कुठल्याही गावाच्या मध्यावरचा उंच हायल्या पाड्यांवर चढतांना आपण त्या गावांत शिरतांनाच्या वेशीवरल्या झोपडी धाखलीतल्या माणसांचा- आपल्या माणसांचा यांचा आठव सतत त्यांनी ठेवला. खेडं, शेतीबाडीतल्या कष्टातलं कुणबीपण, सोसाव्या लागणाऱ्या कळा हे यशवंतरावांनी आयुष्यभर ठायी ठायी आठवणी ठेऊन ते ऐरणीवरच ठेवलं. महाराष्ट्रात, देशात, विदेशात सर्वत्र उच्चपरी राहूनही त्यांचा पाय व मन आयुष्यभर या सामान्यांसाठी भक्कमपणानं होत. अशा या विद्यापीठातला विठाईचा यशवंता. महाराष्ट्राचा, देशाचा एक असामान्य कर्तृत्वाचा महापुरूष- राजकर्ता झाला. दीर्घकाळ नव्हे तर कायमस्वरूपी त्याचं चरित्र धडपड - विचार आणि जगणं आपल्याला उर्जा देत राहील असाच हा माणूस आहे. अडाणी खेड्यांचा, विचारवंतांचा, सक्रीय चांगल्या राज्यकर्त्यांच्या साहित्यकला संस्कृतीतल्या प्रतिभावतांचा- आणखी सकलांचा हा यशवंतराव. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्याही राजकारणात आपले वेगळेपण सांभाळून अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेले असे यशवंतराव. असामान्य असे हे यशवंतराव. बहुजन समाजातून वर आलेला आणि अनेक अतुलनीय अभिजात, गुणांनी स्वत:च्या व्यक्तिमत्वात जाणीवपूर्वक जोपासना केलेला हा धुरंधर मुत्सद्दी नेता होता. स्वकर्तृत्वावर प्रतिकूल परिस्थितीशी यशस्वी झुंज देत पायरी पायरीने मोठे होणारे पण पाय मातीतच असलेले असे यशवंतराव. लहानपणापासून त्यांनी केलेल्या तपश्चर्यचे सामर्थ्य होते. विटेवर वीट ठेऊन त्यांनी आपल्या पुढारीपणाची पायाभरणी केलेली होती. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सवंग लोकप्रियतेचा हव्यास किंवा नेतृत्वाचे लघुरस्ते शोधण्याचा आटापिटा यशवंतरावांनी कधीच केला नाही. त्यापेक्षा परिस्थिती दरवेळी पारखून, नीट पारखून आणि परिस्थितीशी कधी जुळते घेऊन , तर कधी माफक संघर्ष करून नेतृत्वाची एकेक पायरी चढण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले होते. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला फार खोलवर जावून कार्यकर्त्यांनी शब्दा शब्दांचं अर्थ लावून गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं ते आहे.
आज काल नेतृत्व याचा अर्थ फारच मर्यादितपणे केला जातो. राजकारणात एखादे पद प्राप्त झाले की त्याला नेता म्हणायची ही सवय जितक्या लवकर दूर होईल तितकी त्याची गरज आहे. नेतृत्व हा शब्द व्यापक अर्थाचा आहे सामुहिक परिणाम घडविणारे त्या त्या सभेतील जे कोणी आदर्श असतील, तेच खरे नेते. नव्या आदर्शाचा संपूर्ण समाज जीवनावर परिणाम करण्यासाठी त्याचा वापर करणारी जी काही माणसे असतात त्यांच्या ठिकाणीही नेतृत्व असतेच. विचारांची माणसांच्या मनाची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आपणे या नेतृत्वाच्या कसोटया असतात.
यशवंतरावांचे साहित्य, महाराष्ट्रातील सभागृह, जन सामान्याचं सभागृह-दिल्ली परदेश भाषणं, पुस्तकं वाचावी. अतिशय संपन्न पुरोगामी विचारांचा साहित्य कर्तृत्वानं भरगच्च भरलेला दिशादर्शक- चारित्र्यसंपन्न असा थोर नेता होता. द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून करावी लागणारी कसरत, दमछाक त्यांनी स्वीकारली. मार्ग काढला. संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ झाला व त्यांच्या अनेकविध क्षेत्रातल्या गाढ अशा विचारांचं दर्शन होत गेलं. हा देश शेतीप्रधान आहे आणि महाराष्ट्र तर अनेकदा दुष्काळग्रस्त असतो. अधिक उत्पन्नाची हरितक्रांतीची शेती- नुस्ता नवा विचार नाही तर गतीशील अशा योजना घडवून आणल्या. कृषी विद्यापीठांच्या मार्फत माझ्या शेतकऱ्यांचा मुलगा जगाच्या शेतीशी स्पर्धा करीत असा प्रतिभावना संशोधक शेती क्षेत्रात व्हावा व मगरळलेली शेती, खेडी संपन्न व्हावी याचा ध्यास घेऊन राज्यकर्त्यांना व समाजाला प्रत्यक्ष कामाला लावलं. हरितक्रांतीपेक्षाही पाणी वापर, धरण, पाटबंधारे योजना किमान दुबार पाण्याची शेती व्हावी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय कृषी खात्यात पाटबंधारे विभागात त्याच्या संशोधनात अन्नधान्य प्रक्रियेत घेतले. 'सह्याद्रीचे वारे' वाचा म्हणजे लक्षांत येईल परभणी कृषी विद्यापीठातलं भाषण आणि 'उजनीच्या' धरणाचं भूमिपूजनाचं पाण्यासंबंधीचं भाषण. पाणी उद्या संपणार. संपणार नाही अशा योजना मोठ्या छोट्या कराव्यात त्याशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी त्याचवेळी त्यांनी 'बर्वे कमिशन' पाणी आयोग उभा केला आणि त्या गंभीर प्रश्नांना गतिमान करून त्या कालबद्ध व्हाव्यात म्हणून आग्रह धरला . नाहीतर वाळवंटाला -दुष्काळाला सामोरं जावं लागेल. ते होऊ नये म्हणून विठोबाला प्रार्थना. शेतीचं नुस्तं एकरी उत्पादन, चांगले वाण करून चालणार नाही त्यावर प्रक्रिया - कृषी उद्योग कृषीक्रांतीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना व विचार रुजविणे. देशात आज अर्थवत्ता व समाजाला सुद्धा अर्थवत्ता देणारी उसाची कारखानदारीच नव्हे तर कापूस प्रक्रिया, सूतगिरण्या व कापडाशी संबंधित जगत निर्माण करीत शेतकऱ्यांना उभं करणारं असावं असे निर्णय घेतले, ते पुष्कळच फलाद्रुप झाले. दूरदृष्टीचे, अनेकविध देशांचे व देशांतर्गत प्रश्नांची, योजनांच्या वाचनानं प्रत्यक्ष जाऊन अभ्यासानं ते आत्मसात करणारे नेते होते. अंगभूत त्या त्या प्रश्नांची जाण व चौफेर ज्ञान आत्मसात करून- विस्ताराचं काम अशा अनेकविध गुणांनी ते दिल्लीनं बोलविलं म्हणून गेले. महत्वाच्या चार पाच खात्यांच काम करतांना खोलवर त्यात स्वत:ला गाडून घेऊन देशाला उभा करू शकतील- सकलांचं भलं होईल असे निर्णय स्वत: घेतले, केंद्राला घ्यायला लावले. हे तिथली भाषणं व निर्णय बघितल म्हणून लक्षांत येतं. त्यासंबंधी पुस्तकातच ते जरूर बघावं तिथे यशवंतरावांची उंची आपणास दिसते. राजकारणात ऊन-सावलीचे दिवस असतात. नव्हे असतातच. शेवटच्या काही काळात त्यांच्या नशिबी आलं पण ते त्यांनी सोसलं, सहज, अबोलपणानं. कारण ते समृद्ध वाचनानं इतिहास नीट वाचून आत्मसात केल्यानं पचविण्याची ताकद माहीत असल्यानं. शांत पण जमेल तेवढं कार्यच करीत राहिले. साहित्याचं त्यांना फार वेड होतं. अनेकविध क्षेत्रातील, भाषेतली पुस्तकं, ग्रंथ एवढं ते कसे कुठे वाचीत होते मला प्रश्न पडत असे. पण त्यावर आत जाऊन चर्चा करतांना ऐकतांना मला शक्ती मिळायची. प्रवासात विशेषत: रात्री 9 ते 11 असं नित्य वाचन असायचं आणि त्या क्षेत्रातल्या मंडळीसोबत त्यांना चर्चा आवडत असे. बहुविध वाचन, अभिजात रसिकता व स्वत: लेखक अशी त्यांची ओळख मला आयुष्यात खूप देऊन गेली. 'यशवंतराव' या माझ्या लहानशा पुस्तकात खूप काही मी लिहिलंय म्हणून इथे पुनरावृत्ती नको. आमच्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीतून झगड देऊन आलेल्यांसंबंधी त्यांना खूप आत्मीय प्रेम होतं. त्यांनी तो ऋणानुबंध आयुष्यभर जपला. नवं आयुष्य दिलं. यशवंतराव गेले त्यावेळी दोन ओळी मी लिहिल्या होत्या.
'तुझी साथ तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मेळवीत गेले.
तुझी साथ तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून गेले.

* ना. धों. महानोर