उस्मानाबाद :- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत टंचाई निवारणार्थ मुरघास तयार  करण्याचे युनिट स्थापन करणे या योजनेचा लाभ टंचाई जाहीर झालेल्या महसूल मंडळातील किमान एका गावात दयावयाचा आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावातील  इच्छुक लाभार्थींचे प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती यांच्याकडे 22 मार्चपर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे.अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे तसेच नियम व अटी याबाबतचा तपशील लाभार्थ्यांनी त्यांच्याशी निगडीत असलेल्या पशुवैद्यकिय दवाखाना अथवा संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा,असेही नमूद करण्यात आले आहे.                    
 
Top