उस्मानाबाद :- येथील तहसील कार्यालयात आज तालुकास्तरीय लोकशाही दिन उपक्रम पार पडला. यात नागरीकांनी तीन निवेदने सादर केली. यातील दोन तक्रारी या तहसील कार्यालयाशी तर एक तक्रार पोलीस विभागाशी संबंधित असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
  आजच्या या तहसील कार्यालयातील लोकशाही दिनात श्री. पाटील यांच्यासह सहाय्यक निबंधक (सहकार), लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता,उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे प्रतिनिधी आदिंची उपस्थिती होती.    
    लोकशाही दिन उपक्रमाचे स्वरुप आता बदलले असून तालुकास्तरावरही आता दरमहिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनात तक्रार अथवा आपली निवेदने नागरीकांनी 15 दिवस अगोदर पाठवावीत,असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.                        
 
Top