उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत मजुर सहकारी संस्था यांना कामे वाटप करण्यासाठी दि. 18 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली बैठक रदृ करण्यात आली असून ही बैठक आता दि. 25 मार्च रोजी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असल्याचे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
कामांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर डकविण्यात आलेली आहे. आजतागायत ज्यांना कामे मिळालेली नाहीत त्यांनाच लॉटरी पध्दतीने ही कामे वाटप करण्यात येतील. तसेच सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांची कामे बैठकीत वाटप न झाल्यास ती कामे मजूर सहकारी संस्थांना वाटप करण्यात येतील. सर्व संबंधितांनी या बैठकीस जिल्हा परिषद नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह वेळेवर उपस्थित रहावे. काम वाटप यादीतील कामे वाटप करणे वा स्थगीत ठेवण्याचे अधिकार काम वाटप समितीस राहतील, असे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प.,उस्मानाबाद यांनी पत्रकान्वये कळविले आहे.