ताज्या घडामोडी

सोलापूर -: सोलापूरातील प्रस्तावित बीएसएफ व सीआयएसच्या जागेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी तसेच नांदणी येथील संभाव्य जमीनीबाबतची आज पाहणी केली.
    वरील ठिकाणच्या जमिनी उपलब्ध होऊ शकतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ना. शिंदे यांनी टाकळी व नांदणी येथील जमिनीची पाहणी केली.
    याप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सीमा सुरक्षा बलाचे महासंचालक सुहास जोशी, सीमा सुरक्षा बल महानिरिक्षक (प्रशासन) अशोककुमार, सीमा सुरक्षा बल उप महानिरिक्षक राजेंद्रसिंग मंडराल, जिल्हा पोलीस प्रमुख राजेश प्रधान, प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख, तहसिलदार शिल्पा ठोकडे आदी उपस्थित होते.
 
Top