सोलापूर -: राज्यातील 1/3 भागात दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळी परिस्थितीला सरकार खंबीरपणे सामोरे जाईल. तसेच विकास कामात खंड पडू देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील रस्ते विकास प्रकल्पाचा शुभारंभ व भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते.
राज्यात सद्या 1900 टँकर सुरु असुन जनतेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे. तसेच राज्यातील तीव्र दुष्काळी तालुक्यामध्ये सिमेंट बंधारे बांधण्यासाठी निधी देणार असल्याचे सांगुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सद्या चारा, पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या परिस्थितीतही राज्य सरकार जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापूर शहर व हद्दवाढ भागात बांधण्यात येणा-या रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच येथील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी वाढीव चटई क्षेत्र देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर शहरासाठी एनटीपीसीच्या सहकार्याने उजनी जलाशयातुन पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी समांतर पाईप लाईनची तरतुद करण्यात आली असल्याने शहराचा पाणी पुरवठ्याबाबतचा प्रश्न कांही दिवसात निकाली निघेल. येथील यंत्रमागधारकांना अबकारी करातुन सुट मिळावी त्याचबरोबर नरसिंग गिरजी व जुनी मील गिरणीतील कामगारांना 2.5 एफएसआय मिळावा यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे अशी मागणीही शिंदे यांनी केली.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता याचे नियोजन करावे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापूर शहर व हद्दवाढ भागात होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी महानगरपालिकेने जातीने लक्ष घालावे. तसेच जिल्ह्यात घरकुलासाठी 57 कोटी रुपयांचा निधी आला असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.
राज्यातील 13 जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असली तरी राज्य शासन याचा ठामपणे मुकाबला करेल. जनता व प्रशासनाने हतबल न होता योग्य तो समन्वय ठेऊन दुष्काळाचा मुकाबला करावा असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
प्रारंभी महापौर अलका राठोड यांनी शहराची सद्य:स्थिती विषद केली. तर आ. प्रणिती शिंदे यांनी मनपाने कर वसुलीला प्राधान्य देऊन ही वसुली अधिक होण्याबाबत अधिका-यांनी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. सुमारे 238 कोटी रुपये खर्च करुन शहर व हद्दवाढ भागातील 62 कि.मी. पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती या अभियानांतर्गत करण्यात येणार असुन हद्दवाढ भागातील 60 टक्के इतक्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर महेश कोठे तर आभार प्रदर्शन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आ. दिलीप माने, आ. दिपकआबा साळुंके-पाटील, माजी ज्येष्ठ मंत्री आनंदराव देवकते, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, उप महापौर हारुण सैय्यद, माजी आ. निर्मलाताई ठोकळ, माजी आ. प्रकाश यलगुलवार, माजी आ. विश्वनाथ चाकोते, माजी महापौर नलिनी चंदिले, मनपा आयुक्त अजय सावरीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.